#bigbreaking : सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

मुंबई – सचिन वाझे प्रकरणात एनआयएकडून तपास मोहीम वेगाने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात  एनआयएने काही दिवसांपूर्वी आणखी एक मर्सिडीज जप्त केली आहे. तसेच  5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून या वाहनाची तपासणी सुरु आहे. त्यामुळे यातून आता नेमक कोणते गूढ उकलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यातच सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आल्याची माहिती आहे.

सचिन वाझे यांची याआधीही प्रकृती एकदा बिघडली होती. तेव्हाही त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तसेच त्यावेळी एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं.

संशयास्पद इनोव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद आढळलेली इनोव्हा मुलुंड टोलनाक्‍यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही गाडी स्वतः सचिन वाझे चालवत असल्याचा संशय एनआयएला आहे. तसेच 25 फेब्रुवारी रोजीचे रात्री एक वाजून 20 मिनिटांचे मुलुंड टोलनाक्‍याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये आरोपींनी पळ काढलेली संशयास्पद इनोव्हा गाडी दिसत आहे.

दरम्यान, मुलुंड टोलनाक्‍यापुढे पडघा टोल नाका येतो आणि इनोव्हा गाडी हाच टोलनाका पार करताना दिसत नाही. तपास यंत्रणांनी पडघा टोलनाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा तपासले. परंतु, ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नव्हती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.