मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचेही नाव घेतले जात आहे. अशातच भाजप पक्षासह मनसे पक्षानेही वाझे यांच्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
Maharashtra: Mumbai police officer Sachin Vaze transferred from Crime Intelligence Unit (CIU) to Citizen Facilitation Centre at Mumbai Police Headquarters.
— ANI (@ANI) March 12, 2021
यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे. त्यांच्या बदलीच्या वृत्ताला सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे.
तत्पूर्वी, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि टीआरपी घोटाळ्यात कारवाई केल्यामुळेच सचिन वाझे यांना लक्ष्य बनवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. वाझे हे निष्णात तपास अधिकारी आहेत. त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना अलीकडील काही दिवसांत हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेले करण वाझेंनी उघडकीस आणले होते. त्यातील संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झाला. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझेंना लक्ष्य केलं जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.