नवी दिल्ली : मेरी कोम (५२ किलो) आणि मनोज कुमार (६९ किलो) जिंकूनही पंजाब पॅथर्सला बिग बाउट बाॅक्सिंग लीग मध्ये गुजरात जाएंट्सकडून २-५ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. या लीगच्या सत्रातील पहिल्या पराभवामुळं मेरीकोमच्या नेतृत्वाखालच्या पंजाब संघाची गुणतालिकेत दुस-या स्थानी घसरण झाली आहे.
मेरी कोम हिने राजेश नरवाल आणि मनोज दर्योधन नेगीचा पराभव केला. बाकी पंजाबच्या सर्व बाॅक्सिंगपटूना पराभवास सामोरे जावं लागलं. गुजरातचा कर्णधार अमित पंघालने(५२ किलो) पीएल प्रसादचा ३-० ने, चिराग (५७ किलो) ने अब्दुलमलिक खालाकोवचा, आशिष कुमार(७५ किलो)ने मोहितचा, सरिता देवी(६० किलो)ने मनीषाचा आणि पूनम पूनिया(५७ किलो)ने सपनाचा पराभव केला.
गुजरातचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे तर पंजाबचा संघ १२ गुणांसह दुस-या स्थानी पोहचला आहे.