अॅडलेड : बिग बॅश लीगच्या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या रशिद खानने बुधवारी विक्रमी तिसरी हॅटट्रिक नोंदविली. त्याने सिडनी सिक्सरविरूध्द ही हॅटट्रिक नोंदविली. तरीही त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
Hat-trick hero 👉 @rashidkhan_19 🧡#BBL09 #OrangeArmy pic.twitter.com/JanmRYByX8
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 8, 2020
अॅडलेडडकडून खेळणा-या रशिदने सिडनी सिक्सर्सच्यी १० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेम्स विंस व सहाव्या चेंडूवर जॅक एडवडर्सला बाद केले. त्यानंतर बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जाॅर्डन सिल्कला बाद करत ही हॅटट्रिक पूर्ण केली.
या लीगमध्ये हॅटट्रिक नोंदविणारा रशीद हा स्ट्रायकर्सचा पहिलाच गोलंदाज ठरला. रशीद खानची ही टी-२० क्रिकेटमधील तिसरी हॅटट्रिक ठरली.