Krrish 4 : वॉर 2 नंतर आता अभिनेता हृतिक रोशनच्या क्रिश 4 या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. लवकरच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार असून, चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन एक नव्हे तर तीन भूमिकेत दिसणार आहे. याच वर्षी क्रिश 4 ची घोषणा करण्यात आली होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन करणार नसल्याची बातमी देखील समोर आली होती.
या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाची कथा आदी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. पुढच्या महिन्यात हृतिकचा बहुचर्चित वॅार 2 हा चित्रपट रिलीज होणार असल्याने हृतिक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो लगेचच क्रिश 4 तयारीला सुरूवात करणार असल्याची माहिती आहे. मात्र, या चित्रपटात नवीन स्टारकास्ट दिसणार की जुनी, याबद्दल सस्पेन्स कायम आहे.
‘क्रिश 4‘ या चित्रपटात हृतिक रोशन एक-दोन नव्हे, तर तीन भूमिकांमध्ये दिसणार आहे. हृतिकने क्रिश 3 दुहेरी भूमिका साकारलेली होती. कोई मिल गया हा आतापर्यंतच्या बॅालीवूडमधील सर्वात गाजलेला चित्रपट आहे. हा चित्रपट साय-फाय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात हृतिकचा अभिनय जितका प्रेक्षकांना आवडला होता. तितकाच या चित्रपटातील जादू या एलियन पात्राने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. डीएनएच्या वृत्तानुसार, जादू क्रिश 4 मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.