रस्त्यावर उभ्या ट्रकला अॅबुलन्सची जोरदार धडक; दोघा सख्या भावांसह 5 जणांचा ‘मृत्यू’

लखनऊ – उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात मृतदेह घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलन्सची कंटेनरला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. माधोपूर अमवा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून यात अॅम्बुलन्समधील पाच जणांचा मृत्यू झालाची माहिती समोर आली आहे.

हादसे के बाद क्षतिग्रस्त।

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील चित्तोडगढ येथील विपिन पाल सिंह (वय,30) यांचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तिचा मोठा भाऊ नवनीत सिंह हे आपल्या मित्रांसह खासगी अॅम्बुलन्समधून मृतदेह घेऊन आपल्या घरी जात होते.

अॅम्बुलन्स माधोपुर अमवा स्थित राष्ट्रीय महामार्गवर पोहोचताच रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला अॅम्बुलन्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसल्याने अॅम्बुलन्स ट्रकमध्ये घुसली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अॅम्बुलन्स बाहेर काढली. यातील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील दोघा भावांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.