‘महिमा चौधरी’चा मोठा खुलासा; “बॉलीवूडला केवळ कुमारिका हव्या असतात…’

पुणे – महिमा चौधरी बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. मात्र, अजूनही तिचे प्रशंसक सिनेसृष्टीमध्ये आहेत. मात्र अजूनही आपले परखड मत मांडण्यास महिमा कधीही मागेपुढे बघत नाही. बॉलीवूडमध्ये नायिकांच्या प्रती असलेला दृष्टिकोन आता बदलला जायला लागला आहे.

हल्ली नायिकांकडे एकापेक्षा अधिक चांगले सिनेमे असतात. त्यांना जाहिरातीही चांगल्या मिळत आहेत. चांगल्या कथांचे सिनेमेही मिळत आहेत. पूर्वीपेक्षा अधिक चांगले वर्क लाईफ नायिकांना मिळते आहे. पूर्वी नायिकांप्रती असलेला दृष्टिकोन ठरलेला होता. एकदा एखाद्या नायिकेने कोणाला डेट करायला सुरुवात केली की तिला लगेचच सिनेमासाठी नाकारले जायचे.

रिलेशनशीपमध्ये असल्यास तर सिनेमातील करिअरच संपून जायचे. एवढेच नव्हे तर लग्न झाल्यावर त्या नायिकेला कोणी विचारायचेही नाही. लग्नानंतर मुले झाल्यावर तर त्या नायिकेच्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविरामच लागायचा. पूर्वीच्या नायिकांसाठी कुमारीका असणे हे महत्त्वाचे होते. 

नायिकेने कोणालाही किस केलेलेही नसावे, हे एक महत्त्वाचा निकष मानला जायचा. दुसरीकडे नायक मात्र आपली अफेअर लपवून ठेवायचे. अनेकवेळा सिनेमा रिलीज झाल्यावर त्या नायकाचे रिलेशन असल्याची माहिती मिळायची, पण ते खपून जायचे असे महिमा म्हणाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.