मोठा खुलासा! अंबानींच्या घरासमोरील ‘त्या’ गाडीचे तिहार जेल कनेक्शन आले समोर

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. याचे आता तिहार जेल कनेक्शन समोर आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने ज्या टेलिग्राम चॅनेलवरून पोस्टर शेअर करत धमकी दिली होती. ते अकाउंट ज्या फोनवरून बनविण्यात आले होते त्याचा मागोवा घेण्यास तपास यंत्रणांनी खासगी कंपनीला सांगितले होते. या फोनचा नंबर ट्रेस झाला असून ते पोस्टर तिहार जेलमध्ये बनवण्यात आले आहे. दरम्यान, पुढील तपास सुरु आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेले वाहन आढळले. त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांनंतर ठाण्याच्या खाडीत आढळला. हिरेन यांच्या मृत्यूवरून विरोधकांनी वाझे यांना संशयाच्या घेऱ्यात उभे केले आहे. 

या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत केली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.