पीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने आज पीएमसी खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली असून आता खातेदारांना आणखी ५० हजार रुपये काढण्यात येणार आहे. परंतु, यासोबतच आरबीआयने काही अटीही लागू केल्या आहेत. तरीही नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेत लाखो रुपये अडकून पडल्याने फत्तोमल पंजाबी (५९ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. आणि ५१ वर्षीय संजय गुलाटी यांचाही मृत्यू झाला होता. या घटना ताज्या असतानाच तणावामुळे आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केली होती.

या पार्श्वभूमीवर आरबीआयने पीएमसी बँकेतून अधिकचे पैसे काही अटींवर काढण्यास मान्यता दिली आहे. वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी खातेदार त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढू शकणार आहेत. यासाठी बँकेमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे दिल्यास हे पैसे मिळू शकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.