सुरत : गुजरातमधील नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात मोठी दगडफेक झाली असून सहाजण जखमी झाले आहेत. उंधेला गावात सोमवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील प्रमुखांनी हा गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. येथून जवळच मंदिर आणि मशीद आहे. कार्यक्रम सुरु होण्याआधी काही लोकांनी येऊन तो बंद करण्यास सांगितले. यानंतर केलेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत.
Gujarat | Stones pelted during Navratri celebrations in Kheda;6 people got injured
During Navratri celebrations in Undhela village last night, a group led by two people named Arif & Zahir started creating a disturbance. Later they pelted stones in which 6 got injured: DSP Kheda pic.twitter.com/EF05bPDKIc
— ANI (@ANI) October 4, 2022
दगडफेक झाल्याची माहिती मिळताच डीएसपी राजेश गाधिया आणि क्राइम ब्रांचचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस सध्या आरोपींची ओळख पटवत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
“उंधेला गावात नवरात्री साजरी होत असताना आरिफ आणि जाहीर यांनी काहीजणांसोबत मिळून गोंधळ घातला. यानंतर त्यांनी दगडफेक केली, ज्यामध्ये सहा जण जखमी झाले,” अशी माहिती डीएसपी राजेश गाधिया यांनी दिली आहे.