नवी दिल्ली : ऍलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून रोज नवीन निर्णय घेण्याचा धडाकाच सुरु केला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतले. तसेच त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत आहे. हे सर्व होत असतानाच आता कर्मचाऱ्यांना मस्क यांनी पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे.
शुक्रवारी ट्विटरने भारतातील तीन पैकी दोन ऑफिस बंद केले आहेत. हे दोन ऑफिस मुंबई व दिल्लीतील आहेत. जेव्हा कर्मचारी कार्यालयात पोहचले, तेव्हा त्यांना ही माहिती मिळाली.
सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे भारतात आता केवळ तीनच कर्मचारी आहेत. ऍलन मस्कने 44 मिलियन डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून धडाकेबाज निर्णय घेतले. ट्विटरमध्ये साडेसात हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी अर्ध्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ट्विटरचे भारतात २०० कर्मचारी होते. त्यात कपात करण्यात आली. आता केवळ तीन कर्मचारी उरले आहेत. या तीन कर्मचाऱ्यांपैकी एक जण कन्ट्री टीम लीडर आहे. अन्य दोघांमध्ये नॉर्थ आणि ईस्ट तर दुसऱ्याकडे साऊथ झोन दिले आहे. हे सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहे.
ट्विटरचे बेंगळुरु कार्यालय सुरु आहे. त्यातील कर्मचारी सरळ अमेरिकेतील कार्यालयात रिपोर्ट करतात. त्यांचा भारतातील कार्यालयांशी संबंध येत नाही. त्यामुळे एका अर्थाने ट्विटरने भारतात केवळ तीन कर्मचारी ठेवले आहे.