नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना शिक्षाही जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गुजरातच्या सुरत न्यायालयाने आज चार वर्षांनी राहुल गांधी यांना या प्रकरणात दोषी ठरवले आहे. दरम्यान, आजच्या सुनावणी दरम्यान, राहुल गांधी न्यायालयात हजर होते. आज दिल्लीहून सकाळीच सुरतला पोहोचले होते.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi reaches Delhi airport.
Rahul Gandhi to visit Surat today as Surat District Court is likely to pass an order in a criminal defamation case against him over his alleged ‘Modi surname’ remark. pic.twitter.com/aoaJwr0k4D
— ANI (@ANI) March 23, 2023
दरम्यान, 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी या सभेत,” नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात ? असा सवाल जाहीर सभेत केला होता.
राहुल यांच्या या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. भाजप आमदाराने आरोप केला होता की, 2019 मध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना, सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत राहुल यांनी संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी केली असल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला होता. याच प्रकरणात आता राहुल गांधींना कोर्टाने दोषी ठरवले आहे.