पुणे – गेल्या काहीदिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा करोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यासोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर राज्यातील काही शाळा 19 जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
दरम्यान, आता लवकरच पुण्यातील शाळा पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. येत्या मंगळवार पासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. करोना आढावा बैठकी दरम्यान अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.