नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार’ आणि पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांची आज (दि. १७) नवी दिल्लीत भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची जवळपास तासभर चर्चा असून,
ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली या विषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, मोदी आणि पवार भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना चांगलंच उधाण आलं आहे.
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8
— ANI (@ANI) July 17, 2021
दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले.
गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काल (दि. १६) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.