मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल (दि. 3) हल्ला झाला होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं समोर आले. यात देशपांडे हे जखमी देखील झाले होते. आता या हल्ल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून आले होते आणि देशपांडे यांना स्टंपने मारहाण केली होती. यावेळी देशपांडे यांच्या पायाला दुखापत झाली होती.याप्रकरणीच गुन्हे विभागाने कारवाई करत भांडुपमधून दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते. दोन्हही आरोपींचा कोणत्या राजकीय पक्षाची संबंध आहे का ? त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले ? याचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करत आहेत.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन आरोपींचे फोटोही समोर आले होते. मुंबई पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं होत. अखेर पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलं आहे.
Sandeep Deshpande Attacked CCTV : संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे सीसीटीव्हीत कैद#SandeepDeshpande #ViralVideo #MumbaiPolice #MNS #RajThackeray pic.twitter.com/oXm1dbttWS
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) March 4, 2023
हल्ल्यानंतर हिंदुजा रुग्णालयात देशपांडे यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे कोणते आक्रमक पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.