मोठी बातमी: अपघातानंतर पीएमपीएमएल बसला लागली आग; तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे – नगर रस्त्यावरच्या खराडी बायपास जवळ एका पीएमपीएमएल बसला भीषण आग लागली आहे. या घटनेत बस खाली आलेल्या दुचाकी चालक तरुण यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. खराडी दर्गा परिसरातील बालाजी हॉस्पिटल समोर आज (दि. २१) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, या घटनेमध्ये मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव अजिंक्य येवले असून, तो २६ वर्षांचा होता. बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे झालेल्या घर्षणातून पी एम पी एम एल बसने पेट घेतला. सीएनजी वर चालणारी बसल्यामुळे बस जागीच जळून खाक झाली.

मात्र, बस मधील प्रवासी वेळेत खाली उतरल्यामुळे मोठी जीवित हानी झाली नाही. या सर्व घटनेमुळे स्थानिक आणि वाहन चालवणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली आणि परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.