मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 153 (A) या कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली असून उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह 500 ते 600 शिवसैनिकांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवसैनिकांनी घराबाहेर गैरवर्तन केले असा आरोप राणा दाम्पत्याने केला आहे.