मुंबई – मुंबईतील तीरा कामत (Teera Kamat) या पाच महिन्यांच्या चिमुकलीवरील उपचारासाठी आता केंद्रसरकारने सूत्रे अहलवली आहेत. मुंबईतील कामात कुटुंबातील ‘तीरा कामात’ या 5 महिन्याच्या चिमुरडीला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्धर आजाराने ग्रासले आहे.
या गंबीर आजारावर भारतात उपचार उपलब्ध नाहीत. अमेरिकेत मात्र यावर उपचार आहे. मात्र तो उपचार कोणत्याही सामान्य व्यक्तीला परवडणारा नाही. याचे कारण म्हणजे या आजारावरील इंजेक्शनची किंमत आहे तब्बल 16 कोटी रुपये इतकी आहे. ‘झोलजेन्स्मा’ असे या औषधाचे नाव असून आता हे औषध अमेरिकेतून मागण्यात येणार आहे. (Teera Kamat Medicine) हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे 6. 5 कोटी रुपये आणखी खर्च येणार होता.
दरम्यान, 16 कोटी रुपयांच्या या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. फडणवीस यांनी 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली होती.