मुंबई – देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांसह अधिकारी, लोकप्रतिनिधी व सेलिब्रिटींनाही कोरोना बाधा झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच आज राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
याबाबतची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. याबाबतची माहिती देताना कडू यांनी, “माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.” असं आवाहन केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) September 19, 2020
तत्पूर्वी, काल महाराष्ट्र सरकारमधील दोन मंत्र्यांना कोरोना बाधा झाल्याचे समोर आले होते. यामध्ये उर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा समावेश होता.