मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षांही पुढे ढकलली; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अमित देशमुख यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत१९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

तसेच, या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, असेही देशमुखांनी सांगितले आहे.

दरम्यान,  नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.