मुंबई – पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत जात असताना काशिमीरा परिसरात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना मुक्का मार लागला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सावंत हे पालघरच्या दिशेने जात असताना महामार्गावर काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यावेळी त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून त्यांना पोलिसांनी मुंबईत उपचारासाठी अँम्ब्युलन्सने पाठवले आहे.