मोठी बातमी : आधारभूत किंमतीबाबत लेखी आश्‍वासन देण्यास मोदी सरकार तयार

नवी दिल्ली – किमान आधारभूत किंमतीबाबत लेखी आश्‍वासन देण्याची तयारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दाखवली. शेतकऱ्यांच्या निदर्शनांनी चौथ्या आठवड्यात प्रवेश केल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पाठवलेल्या पत्रात ही तयारी दर्शवण्यात आली आहे. ( farmer protest updates )

निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक समुह किमान आधारभूत किंमत कायम ठेवण्याची मागणी करत आहे. त्या तरतुदीत किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किमतीला शेतीमाल खरेदी केल्यास त्याला कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षांच्या तरतुदीचा समावेश होता.

तोमर आपल्या पत्रात म्हणातात, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे देशातील बहुतांश शेतकरी खूष आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारावर तणाव निर्माण करण्याच्या हेतूने रचलेल्या कटाचा भाग म्हणून काही गटांनी त्याबाबत संदीग्धता निर्माण केली. ( farmer protest updates )

मी सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहे. लहानपणापासून मी शेतकऱ्यांच्या कठीण आयुष्याचा अनुभव घेतला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर यावेळी किमान आधारभूत किंमतीने उच्चांक गाठला, ही समाधानकारक बाब आहे.

किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्यांवरून असत्य पसरवण्यात आले. प्रत्यक्षात यातील काही बदलले जाणार नाही. गेल्या सहा वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. ( farmer protest updates )

या कायद्याने शेतकऱ्यांना आपले उत्पादन देशांत कोठेही विकण्याची मुभा दिली आहे. किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्यांचे अस्तीत्व याबाबत सरकार लेखी आश्‍वासन देण्यास तयार आहे.

स्वामीनाथन समितीच्या शिफारसी स्वीकारण्याच्या बाजूने कॉंग्रेस आठ वर्ष होती. मात्र, आता ते तणाव निर्माण करत आहेत. ते आता आमचे लष्कर आणि लेह लडाखमध्ये केलेल्या त्यागावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत, असेही यात म्हटले आहे. ( farmer protest updates )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.