मोठी बातमी : ‘कॉमन मॅन’चं बजेट कोलमडणार; घरगुती सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

नवी दिल्ली – एकीकडे देशात सर्वसामान्य जनता पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण होत आहे तर दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता  25  रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे  घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने  सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

आज पासून ( 25 फेब्रुवारी ) हे दर लागू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.

तत्पूर्वी,  डिसेंबरपासून एलपीजी गॅस दर वाढले आहे. यामध्ये 1 डिसेंबरला  दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले होते त्यानंतर 1 जानेवारी महिन्यात  दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले. तर फेब्रुवारी महिन्यात तीनदा एलपीजी गॅस दर  वाढलेले दिसून आले.  4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले 15 फेब्रुवारीला  दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले. 25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.