नवी दिल्ली, दि. 27 – पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट तर्फे करोनावर आणखी एक लस येणार आहे. या कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला यांनीच ही माहिती दिली असून या नवीन लसीचे नाव कोवोवॅक्स असे आहे.
या वर्षीच्या सप्टेंबर पासून ही लस उपलब्ध होईल असे त्यांनी म्हटले आहे. या नव्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. सीरम कंपनीने नोवावॅक्स या अमेरिकन कंपनीच्या मदतीने ही लस विकसित केली आहे. त्याच्या क्लिनीकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. अफ्रिका आणि ब्रिटन मध्ये करोनाचा जो नवा विषाणू सापडला आहे त्यावरही ही लस प्रभावी ठरणार आहे.
तिचे उपयोगीत्व 89 टक्के इतके आहे, असेही सांगण्यात येत आहे. अदर पुनावाला यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांच्या कंपनीने ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनका कंपनीच्या लसीचा भारतात खुप पुर्वी पासूनच उत्पादन सुरू केले असून ही लस विदेशातही अनेक ठिकाणी वितरीत करण्यात येत आहे.