Ajit Pawar : आत्ताच्या घडीची एक ब्रेकींग न्यूज समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण डीजीसीआयने दिले आहे. ही घटना महाराष्ट्राला हेलावून टाकणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघाताचे फोटो समोर अंगावर काटा आणणारी आहेत. भीषण अपघातात विमान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळाताच अजित पवार (Ajit Pawar )यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाले आहेत.