मोठी बातमी : लंडनहून भारतात आलेले 5 प्रवासी करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – महाराष्ट्रात करोनाचा नाईट कर्फ्यू लागलेला असतानाच चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच प्रवासी करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच प्रवासी करोना पॉझिटीव्ह आढळले असून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या विमानात एकूण २६६ प्रवासी होते. विशेष म्हणजे ब्रिटनमध्येच करोनाचा घातक विषाणू सापडला आहे. या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे. 

दरम्यान, करोनाच्या नव्या व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर भारतासह सुमारे 13 देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. आठवडाभरासाठी ही बंदी असणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सध्याच्या करोनाच्या कहरानंतर या व्हायरस प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. त्यातून राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्याचा संबंध ब्रिटन येथे सापडलेल्या व्हायरसशी जोडला जात आहे. पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल की काय, अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.