पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीचा 91.25 टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या निकालाच्या मानाने यंदाच्या निकालात घट झाल्याचे पाहायला मिळाले.
यंदाच्या निकालामध्ये मुलींचे उत्तीर्ण प्रमाण मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी जास्तं आहे. यावेळेस एकूण 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
असा आहे विभागाचा निकाल
पुणे : 93.34
नागपूर : 90.35
औरंगाबाद : 91.85
मुंबई : 88.13
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
नाशिक: 91.66
लातूर : 90.37
कोकण : 96.01
एकूण : 91.25
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात दहावी बारावीची परीक्षा झाली होती. कोरोनानंतरची ही पहिलीची परीक्षा होती म्हणून यावेळी कॉपीमुक्त नांदेड पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे कापी हा प्रकार कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनीही योग्य वेळेत उत्तर पत्रिकांची तपासणी केली. यामुळे आज बारावीचा निकाल जाहीर झाला.
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
https://hsc.mahresults.org.in/
https://hscresult.mkcl.org/
https://hsc.mahresults.org.in