हैदराबाद – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठया रोख रकमेच्या व्यवहारांवर करडी नजर आहे. तेलंगणा पोलिसांनी कारवाई करून 8 कोटी रुपये जप्त केले आहेत. ही सर्व रक्कम एका भाजप नेत्याच्या बॅंक खात्यातून काढण्यात जप्त आली आहे. पोलिसांनी सुरुवातीला कार अडवून त्यातून 2 कोटी रुपये जप्त केले आहेत.
यात ड्रायव्हर आणि त्याच्या सहकाऱयाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली तेव्हा भाजप नेत्यांची नावे समोर आली. पोलिसांनी या कारमध्ये प्रवास करणाऱ्या टी प्रदीप रेड्डी आणि जी शंकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनीच हा पैसा भाजप मुख्यालयाचे ऑफिस अटेंडन्ट एन. गोपी यांच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. पोलिसांनी गोपी आणि इतर 4 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या आणखी 6 कोटी रुपये जप्त केले.