जिनेव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळं दर्शवणारा नकाशा तयार केला आहे. करोना महामारीचा प्रकोप दर्शवणाऱ्या नकाशात ही चूक झाली आहे. या चुकीमागे चीनचा हात असू शकतो अशी शंका व्यक्त केली जाते आहे.
कारण चीन आणि जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओ यांची अभद्र युती करोनाच्या काळात समोर आली होती. भारताचा नकाशा चुकीचं असल्याचं लंडनमधील एका भारतीय व्यक्तीमुळे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या नकाशावरून सोशल मीडियावर टीका केली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भारतीयांनी यावर करडी नजर ठेवली आहे. असं म्हटलं जातंय की, चीनच्या इशाऱ्यावरून भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर,आणि लडाखला वेगळे करण्यात आलं आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या आयटी कंसल्टंट पंकज यांच्या नजरेत ही गोष्ट आली.
वेगळ्या रंगात जम्मू-काश्मीर आणि लडाख –
जो नकाशा जाहीर केला आहे यामध्ये जम्मू काश्मीरसोबत लडाख असं भारतापासून वेगळं करण्यात आलं आहे. हा रंग कोडेड मॅप डब्ल्यूएचओच्या अधिकृत वेबसाइटर उपलब्ध आहे. भारताचा भाग यामध्ये निळ्या रंगाने दाखवला आहे.
मॅपमध्ये देशातील दोन नवे केंद्रशासित प्रदेशांना ग्रे रंग दिला आहे. अक्साइ हा चिनचा वादग्रस्त भाग आहे याला ग्रे रंग दिला आहे. ज्याला निळ्या रंगाची धार आहे.