शिक्रापूर : ग्रामविकास आघाडीच्या प्रचारात बडे नेते मैदानात

शिक्रापुरात वॉर्ड एकमध्ये प्रचार जोरात; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शिक्रापूर – सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना शिक्रापूर येथे देखील दोन वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून सरळ लढत होत आहे. शिक्रापूर गावातील वॉर्ड क्रमांक एकमधून शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या उमेदवारांसाठी बडे नेते मैदानात उतरताना दिसत आहेत. त्यामुळे वेगळीच रंगत निर्माण झाली असून येथील उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचा प्रचार जोरात सुरु असल्याने कार्यकर्ते व उमेदवार देखील समाधान व्यक्त करीत आहेत.

शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड एकमध्ये मयूर खंडेराव करंजे, वंदना रमेश भुजबळ व सारिका उत्तम सासवडे हे तिघे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वार्ड क्रमांक एकमध्ये प्रचार करत फिरत असताना प्रत्येक मतदारांच्या घरी जात उमेदवार आपली माहिती देत निवडणूक चिन्हाची माहिती देत आहेत.

दरम्यान ज्येष्ठ मतदारांकडून या सुशिक्षित उमेदवारांचे औक्षण करत त्यांना निवडणुकीसाठी आशीर्वाद दिले जात आहे. सध्याचे उमेदवार हे सुशिक्षित असल्यामुळे पुढील काळामध्ये गावातील समस्या सोडवीत गावचा नक्कीच विकास करतील असा आशावाद मतदार व कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

आज प्रचारासाठी माजी सरपंच आबासाहेब करंजे, शुभम भोसले, दीपक करंजे, सचिन करंजे, ऋषिकेश फुलवारे, दीपक भुजबळ, अक्षय करपे, स्वप्नील करपे, मंगेश सासवडे यांसह आदींनी उमेदवारांची माहिती देत हेच उमेदवार वॉर्डाचा विकास कसे करतील हे पटवून दिले. शिक्रापूर ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात विशेष सहभाग नोंदविला आहे. प्रचारादरम्यान मतदारांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आघाडीचे पॅनलचे प्रमुख, सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.