गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच राष्ट्रवादीला मोठा दणका बसला आहे. गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
शिवणकर हे पक्षावर नाराज असून जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये सध्या काहीच आलबेल नसल्याचे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणूक समोर असताना शिवणकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवणकर हे आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला चागंलाच दणका दिला असल्याचे यामधून दिसून येत आहे.