बीग बीचा चाहत्यांपुढे नवा आदर्श; भरला 70 कोटींचा कर

बॉलिवूडमधील बीग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल 70 कोटी रुपयांचा कर भरला आहे. अमिताभ यांची 2018-19 आर्थिक वर्षातील सर्वाधिक करदात्यांपैकी एक ठरले आहेत. याबाबतची माहिती अमिताभ यांच्या प्रवक्‍त्यांनी दिली.

अमिताभ यांनी 2018-19 या आर्थिक वर्षात तब्बल 70 कोटी रुपये टॅक्‍स आयकर विभागाकडे जमा केला आहे. त्यांनी त्याशिवाय काही रक्कम देणगी स्वरुपात दानही केली आहे. तसेच त्यांनी 10 लाख रुपये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठीही दिले आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूर या गावातील 2084 शेतकऱ्यांचे कर्ज अमिताभ यांनी स्वत:च्या पैशाने चुकवले आहे.

गेल्यावर्षी केरळमध्ये पावसामुळे हाहा:कार माजला होता. तेथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले होते. अमिताभ यांनी अशा लोकांसाठी 51 लाख रुपयांची मदत दिली होती. अमिताभ यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी 80 जॅकेट, 25 पॅंट, 20 शर्ट आणि काही स्कार्फही दिले होते.

अनेकदा कर बुडवण्यासाठी राजकारणी, उद्योगपती, बिल्डर यांसारखे विविध लोक विविध प्रकारच्या शक्कल लढवत असतात. पण 70 करोड रुपये आयकर जमा करत, अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांसह सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे. फक्त अमिताभ बच्चनच नाही तर सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.