मोठ्या मनाचा.! भाईजान धावला राखीच्या मदतीला; आई म्हणाली “सलमान बेटा…’

मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रामा क्‍वीन राखी सावंत आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटनाचा सामना करतेय. राखीच्या सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. यासंदर्भातील एक पोस्ट सुद्धा राखीने आपल्या इंस्टारग्रामवर शेअर केली होती.

“माझ्या आईसाठी प्रार्थना करा… तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत’ या आशयाची भावनिक साद राखीने आपल्या फॅन्सला घातली होती. मंगळवारी (दि. २३) रात्री उशीरा राखी सावंतने आपल्या आईचे दोन फोटो शेअर करत या बद्दल माहिती दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

दरम्यान, आता राखी सावंतने तिच्या आईचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये राखीची आई अभिनेता ‘सलमान खान’चे आभार मानताना दिसत आहे. दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठी सलमानला ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीची आई व्हिडीओ मध्ये म्हणते कि, “सलमान बेटा धन्यवाद… सोहेल बेटा धन्यवाद..! मी तुमची आभारी आहे. मी आता दवाखान्यातच आहे, मला आतापर्यंत चार कीमो चढवले आहेत अजून दोन चढवले जाणार आहेत त्यानंतर माझे ऑपरेशन होईल. सलमान आणि सोहेल बेटा तुम्ही अशीच प्रगती करत राहा, देव तुमच्यासोबत आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल..” असं त्या म्हणाल्या. यापूर्वी देखील सलमान खानने अनेकांना मदत केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.