बडे दिलवाला

बॉलीवूडमध्ये प्रेमप्रकरणांची वानवा नाही. हा सिलसिला अनेक वर्षापासूनचा आहे. मग दिलीपकुमार-मधुबाला असो, रेखा-अमिताभ असो, ऐश्‍वर्या सलमान किंवा ऐश्‍वर्या विवेक ओबरॉय असो. या जोड्यांचे मनोमिलन झाले असले तरी ते कागदावर उतरले नाही. त्याचे पडसाद कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उमटत असतात.

विवेक ओबरॉय आणि ऐश्‍वर्या यांची रिलेशनशिप सर्वश्रूत आहे. मात्र ती आता सौ. अभिषेक बच्चन झाल्याने या रिलेशनशिपला पूर्णविराम मिळाला. मात्र या कारणावरून अभिषेक आणि विवेक ओबरॉय यांच्यात तणाव राहिला आहे. मात्र हा तणाव निवळल्याचे चित्र नुकतेच दिसून आले.

अभिषेक बच्चन आणि विवेक ओबरॉय यांच्यात सर्वकाही ऑल इज वेल आहे, असे दिसते. दोघांतील वाद आता मिटल्यागत जमा झाले आहेत. कारण अलीकडेच जे काही घडले, त्यावरून वाद मिटल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्या होत्या. त्यात अभिषेक बच्चन आणि विवेक ओबरॉय देखील होते.

या कार्यक्रमात दोघेही समोरासमोर आले तेव्हा त्यांनी गळाभेट घेतली. अगोदर तर विवेक हात मागे घेऊन उभा होता. समोर अभिषेक हा वडील अमिताभ बच्चन यांच्यासमवेत उभा होता. मात्र दोघांची नजरानजर झाली दोघांनी गळाभेट घेतली.

विवेक हा काही काळ अभिषेकची पत्नी ऐश्‍वर्या रॉय बच्चनसमवेत रिलेशनशिपमध्ये होता, हे सर्वांनाच माहीत आहे. कालांतराने दोघेही वेगळे झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कधीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही आणि चित्रपटात एकत्र काम केले नाही. मात्र काही महिन्यापूर्वी विवेक ओबरॉयने ऐश्‍वर्या रॉयवर बनलेल्या एक मीमला सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा पुन्हाएकदा या रिलेशनशिपला हवा मिळाली. विवेकला खूप ट्रोल करण्यात आले.

त्यावेळीही अभिषेक आणि ऐश्‍वर्या रॉय यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी अभिषेक हा खरोखरच मोठ्या मनाचा आहे. त्याने जुन्या आणि कटू आठवणींना महत्त्व दिले नाही. अन्यथा काही मंडळी तर अशा प्रकारच्या गोष्टी आयुष्यभर विसरत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.