#U19CWC : विजेतेपदासाठी भारत- बांगलादेश आज भिडणार

पोशेफस्ट्रूम : भारत आणि बांगलादेश या संघाने उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय साकारला. त्यामुळे १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज (रविवार ,९ फेब्रुवारी) दोन आशियाई संघात विजेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे.

पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा दहा विकेटने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली होती. तर दुस-या उपांत्य फेरीत बांगलादेशने न्यूझीलंडचा सहा विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी अंतिम फेरीपर्यतच्या प्रवासात एकही सामना गमावलेला नाही.

भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यत विश्वचषक स्पर्धेत एकूण ४ सामने खेळले गेले आहेत. यात भारताने तीन वेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशने एकदा भारताला पराभूत केले आहे.

https://twitter.com/cricketworldcup/status/1226143653929857024?s=19

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. भारताने तब्बल चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे बांगलादेशने प्रथमच विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. भारताचे पारडे जरी जड असले तरी अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.