शेअर बाजार निर्देशांकात मोठी घट!

Madhuvan

मुंबई – शेअर बाजरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली असून सुरूवातीच्या सत्रात निर्देशांकात ३८६.२४ अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये १२० अंकांची घसरण झाली.

शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ३८६.२४ अंकांची घसरण होऊन बाजार ३७,२८२.१८ वर उघडला. तर निफ्टीमध्येही १२० अंकांची घसरण होऊन ११,०११ वर उघडला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काहीच वेळात निर्देशांकात ५५० अंकांपर्यंतची घसरण झाली.

तसेच, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व, मारुती, अॅक्सिस बँकेच्या समभागांमध्ये १.५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, करोनाने बेजार झालेली अर्थव्यवस्था आणि कृषि विधेयकांवरून सुरु असलेलं आंदोलन यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सलग ६व्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.