मोठा निर्णय ! व्हॉट्सअ‍ॅपचे एक पाऊल मागे ; प्राइव्हसी पॉलिसीचा निर्णय पुढे ढकलला पण…

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने ४ जानेवारीला आपल्या नव्या टर्म ऑफ सर्व्हिस जाहीर करत सगळ्या युझर्सला मोठा धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणार होत्या. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या प्राइव्हसी पॉलिसीमुळे सगळीकडे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले होते. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपकडून खुलासाही करण्यात आला. पण, होत असलेली टीका आणि संशयाचे वातावरण कायम असल्याने व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप नवीन प्राइव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. या पॉलिसीमुळे नागरिकांची माहिती सार्वजनिक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकाचे व्हॉट्सअ‍ॅपकडून निरसनही करण्यात आले होते. मात्र, संशयाचे व भीतीचे वातावरण कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच दुसऱ्या अ‍ॅपकडे लोक वळू लागल्याने व्हॉट्सअ‍ॅपने प्राइव्हसी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, त्यामुळे प्राइव्हसी अपडेट करण्याचा निर्णय पुढे ढकलत असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे. “ज्या शर्तीची समीक्षा करून त्या स्वीकारण्यासाठी जी तारीख देण्यात आली होती, ती आम्ही मागे घेत आहोत.

८ फेब्रुवारीला कुणीही आपले अकाऊंट बंद किंवा डिलीट करू शकणार नाही. आम्ही चुकीची माहिती दूर करण्यासाठी आणखी काम करणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीने काम करतेय याविषयी स्पष्टता आणणार आहोत. १५ मे रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार आहोत,” असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.