प्रतीक्षा संपली! ठाकरे सरकारचा १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय

मुंबई – राज्यातील कोरोना संकटाचे काळे ढग कायम असतानाच आज ठाकरे सरकारतर्फे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

करोना संकटात राज्य सरकारचा मोठा निर्णयमुंबई – राज्यातील कोरोना संकटाचे काळे ढग कायम असतानाच आज ठाकरे सरकारतर्फे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर बातमी येथे https://wp.me/p6cW7J-3ADU वाचा.

Posted by Digital Prabhat on Wednesday, 16 September 2020

“आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे” अशी माहिती देशमुख यांनी दिली.


दरम्यान, कोरोना संकटामुळे देशासह राज्याची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. अर्थचक्रे ठप्प झाल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसतानाच ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील भरतीची वाट पाहणाऱ्या तरुण – तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.