सातारा – शहरातील पश्चिम भागातील पेठांमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी वाहनांची फोडतोड करुन मोठे नुकसान केले आहे.
नाशिक, पुण्यापाठोपाठ वाहने फोडण्याचे लोण आता साताऱ्यात पोहचले आहे. मंगळवार पेठ, कोल्हटकर आळी, विठोबाचा नळ, गडकर आळी या परिसरातील वाहने रात्री फोडली आहेत. पोलिसांनी या प्रकाराची पाहणी केली आहे.