वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल! ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’साठी १००० नाही, तर भरावा लागणार ‘इतक्या रुपयांचा दंड, नवे नियम काय आहेत?

Pune Police | पुण्यात दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या वाढताना दिसत आहे. त्यासोबतच नियम मोडणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी आता जे नियम मोडतील त्यांच्यावर दहापट दंड आकारण्याचा नियम लागू केला आहे. सगळ्यात मोठा बदल तो म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी आधी फक्त १००० रुपये दंड होता. मात्र आता हा नियम मोडल्यास १० हजार रुपये भरावे लागणार आहे, तसेच ६ महिन्यांचा तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. अनेक भीषण अपघात पुणे शहरात होत असल्याने आणि नियमांच पालन होत नसल्याने हे बदल करण्यात आले आहेत.
कुठला नियम मोडल्यास किती दंड आकारण्यात येईल?
सीटबेल्ट शिवाय वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे
जुना दंड: १०० रुपये
नवीन दंड: १००० रुपये
हेलमेट शिवाय गाडी चालवणे
जुना दंड: १०० रुपये
नवीन दंड: १००० रुपये किंवा ३ महिन्यांसाठी लायसन्स जप्त
विमा नसलेले वाहन चालवणे
जुना दंड: २००-४०० रुपये
नवीन दंड: २००० रुपये (पहिल्यांदा)
४००० रुपये (दुसऱ्यांदा) किंवा ३ महिने तुरुंगवास
अतिवेगाने गाडी चालवणे, सिग्नल उल्लंघन, लाइसेंस विना गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल वापरणे
जुना दंड : ५०० रुपये
नवीन दंड: ५००० रुपये
मद्यप्रशान करून गाडी चालवणे
जुना दंड: १५०० रुपये
नवीन दंड: १० हजार रुपये किंवा ३ महिने तुरुंगवास
अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे
जुना दंड: २५०० रुपये
नवीन दंड: २५ हजार रुपये किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास आणि १ वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द





