नवी दिल्ली – गेल्या दहा वर्षात सोन्याचे दर ज्या पद्धतीने वाढले आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेली सुवर्ण मुद्रीकरण योजना 26 मार्चपासून बंद करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र बँका वैयक्तिक पातळीवर लघु पल्ल्याची सुवर्ण मुद्रीकरण योजना म्हणजे एक ते तीन वर्षाच्या कालावधीची सुवर्ण ठेव योजना सुरू ठेवू शकणार आहेत.
नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांनी 31,164 किलोग्रॅम वजनाचे सोने ठेव म्हणून ठेवले आहे. 15 सप्टेंबर 2015 मध्ये देशातील सोन्याचा वापर व्हावा आणि आयात कमी व्हावी या दृष्टिकोनतून ही योजना सुरू करण्यात आली होती. कमी मुदतीच्या सुवर्ण ठेव योजनेसाठी बँका जबाबदार होत्या. तर मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या योजनेसाठी केंद्र सरकार जबाबदार होते. आता फक्त बँका संदर्भातील योजना चालू राहणार आहे.