लॉकडाऊनसंदर्भात बिग बींची पोस्ट

लॉकडाउनचा काळ हा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठी कठीण काळ ठरत आहे. हा काळ संयमाची परीक्षा घेणारा आहे. आपल्या अनेक इच्छा-आकांक्षांना आवर घालून स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी घरीच थांबण्याचा हा काळ आहे. या काळाने सर्वांना काही ना काही तरी शिकवण दिली आहे. याचसंदर्भात बॉलीवूडमधील बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे.

या ट्विटमध्ये बिग बींनी म्हटले आहे की, या लॉकडाउनच्या काळात मी जितकं काही शिकलोय, समजलोय आणि जाणून घेतलंय ते मी माझ्या 78 वर्षांच्या जीवनातसुद्धा शिकू शकलो नाही. तसेच समजलो आणि जाणूनही घेऊ शकलो नव्हतो. हे सत्य तुम्हाला सांगणं म्हणजे याच शिकवणीचा, समजून घेण्याचा आणि जाणून घेण्याचा परिणाम आहे.

आपल्याला आवश्‍यक तेवढ्याच आणि कमीत कमी वस्तूंमध्ये जीवन कसं जगायचं, हा मोलाचा संदेश या लॉकडाउनने अनेकांना दिला आहे. बिग बींनासुद्धा या लॉकडाउनने खूप काही शिकवले आहे. जे गेल्या 78 वर्षांच्या अनुभवात ते शिकू शकले नव्हते, ते त्यांना या लॉकडाउनच्या काळाने शिकवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.