बॉलीवूडमधील महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत दिलेले योगदान हे खूपच अनन्यसाधारण आहे. अमिताभ बच्चन यांनी अनेक दशकांपासून इंडस्ट्रीजमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या चाहत्यांचीही संख्या ही लाखो-कोटींमध्ये आहे. मात्र, या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. आता अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत तब्बल 52 वर्षे पूर्ण झाली आहेत.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात. ते सतत आपले फोटो आणि व्हिडिओज् चाहत्यांशी शेअर करत असतात. तसेच चाहत्यांच्या प्रश्नांनाही ते सोशल मीडियावर उत्तरे देत असतात. अशातच अमिताभ यांना फिल्म इंडस्ट्रीत 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी त्यांचे जुने फोटोही शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यावर अमिताभ बच्चन यांनीही चाहत्यांनी केलेल्या ट्वीटला रिट्विट करत लिहिले की, “आजच्याच दिवशी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. 15 फेब्रुवारी, 1969, 52 वर्षे. आपल्या सर्वांचे आभार.’ अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट खूपच व्हायरल झाले आहे.
View this post on Instagram
अमिताभ यांनी “सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. अमिताभ यांना त्यांच्या योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ते “चेहरे’, “झुंड’ आणि “ब्रह्मास्त्र’ यासारख्या चित्रपटांत झळकणार आहे.
View this post on Instagram