Big Breaking – हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनात उभी फूट

नवी दिल्ली – केंद्राने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसह गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला काल आंदोलकांतर्फे काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसक वळण लागले. कालच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनामध्ये आज उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय.

आंदोलनामध्ये सामील असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने आंदोलनातून माघार घेत असल्याचा निर्वाळा केलाय. याबाबत संघटनेचे व्ही एम सिंग यांनी पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे इरादे वेगळेच असून अशा परिस्थितीत आम्ही आंदोलनातील सहभाग पुढे कायम ठेऊ शकत नाही असं म्हटलंय.


याखेरीज भारतीय किसान युनियन (भानू) या संघटनेने देखील हिंसाचारानंतर आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. संघटनेचे नेते ठाकूर भानू प्रतप सिंग यांनी याबाबत घोषणा करताना, ‘कालच्या हिंसाचारानंतर आम्ही अत्यंत दुखी असून आम्ही आमचे ५८ दिवसांचे आंदोलन मागे घेत आहोत’ असं सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.