मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना आज (दि. २९) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत या बद्दल माहिती दिली आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
NCP chief Sharad Pawar (in file pic) was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening & was therefore taken to Breach Candy Hospital (in Mumbai) for a check-up. Upon diagnosis, it came to light that he has a problem in his Gallbladder: NCP leader Nawab Malik pic.twitter.com/L337FzeMGN
— ANI (@ANI) March 29, 2021
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
आमचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल (दि. २८) संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं.
Kind attention
Our party president Sharad Pawar saheb was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening and was therefore taken to Breach Candy Hospital for a check up.
Upon diagnosis it came to light that he has a problem in his Gall Bladder.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021
शरद पवारांना हा त्रास झाल्यामुळे त्यांना देण्यात येत असलेली रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे पुढील नोटीसपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.