नवी दिल्ली – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेते ‘कमल हसन’ सध्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ते सध्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्थ आहेत. मात्र, याच दरम्यान कमल हसन यांच्याबरोबर एक मोठी घटना घडली आहे.
Tamil Nadu: Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan’s car allegedly attacked by a man yesterday, while he was returning to Chennai after poll campaigning. He wasn’t injured in the incident. The man was reportedly thrashed by MNM cadres & people, before being handed over to Police. pic.twitter.com/Mdhic10SVH
— ANI (@ANI) March 15, 2021
एका अज्ञात व्यक्तीने कमल हसन यांच्या गाडीवर हल्ला करत खिडकी खोलण्याचा प्रयत्न केला आहे. कलम हसन यांच्यावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ते आपला निवडणूक प्रचार आटपून कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते. आणि यावेळीच त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, या सर्व घटनेत कमल हसन यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ஸ்ரீ ராமச்சந்திரா மருத்துவமனையில் கொரோனாவைரஸ் தடுப்பூசி போட்டுக்கொண்டேன். தன் மேல் மாத்திரமல்ல, பிறர் மேல் அக்கறையுள்ளவர்களும் போட்டுக்கொள்ள வேண்டும். உடல் நோய்த் தடுப்பூசி உடனடியாக, ஊழல் நோய்த் தடுப்பூசி அடுத்த மாதம். தயாராகிவிடுங்கள். pic.twitter.com/SmZEUr4qqT
— Kamal Haasan (@ikamalhaasan) March 2, 2021
कमल हासन यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती त्यांचा फॅन असल्याचं म्हणत आहे. तसेच त्यानं ज्यावेळी हल्ला केला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाला पकडण्यात आलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एमएनएमचे नेते ए.जी मौर्य यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे.