पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात काल चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आज याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. काल चीनसोबत झालेल्या या चकमकीत एकूण २० भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त होते.
मात्र कालच्या चकमकीत जखमी झालेले १७ जवान देखील आज शहीद झाल्याने एकूण संख्या २० झाल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं आहे. याबाबतची माहिती एनआय या नामांकित वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
At least 20 Indian soldiers killed in the violent face-off with China in Galwan valley in Eastern Ladakh. Casualty numbers could rise: Government Sources pic.twitter.com/PxePv8zGz4
— ANI (@ANI) June 16, 2020
एनआयला सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या ४३ इतकी असल्याचं एनआयने म्हंटले आहे. भारतीय लष्कराने मात्र याबाबत आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्याचं म्हटलंय.
Indian intercepts reveal that Chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in face-off in the Galwan valley: Sources confirm to ANI pic.twitter.com/xgUVYSpTzs
— ANI (@ANI) June 16, 2020
And exposed to sub-zero temperatures in the high altitude terrain have succumbed to their injuries, taking the total that were killed in action to 20. Indian Army is firmly committed to protect the territorial integrity and sovereignty of the nation: Indian Army (2/2) https://t.co/5duc0Jlfwb
— ANI (@ANI) June 16, 2020