जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना उपचारांसाठी ते मुंबईकडे रवाना झाले असून याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलंय.
आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याबाबतची माहिती देताना खडसे यांनी, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.” असा संदेश ट्विट केला आहे.
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.@NCPspeaks
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 19, 2020
यापूर्वी त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि त्यांची नात यांनाही कोरोनाबाधा झाली आहे.