मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी दोन आपोरींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे, तर एका बुकीचा समावेश आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे गूढ उकल्याचा दावा एटीएसने केला आहे.
अटक केलेल्यामध्ये आरोपींमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याचा समावेश आहे. विनायक शिंदे लखन भैय्या एन्काऊंटर केसमधील आरोपी आहे. कोविड काळात न्यायालयाच्या निर्णयानंतर विनायक शिंदेला फर्लोवर बाहेर सोडण्यात आले होते. मनसूख हिरेन हत्या प्रकरणात विनायक शिंदेचा हात आहे, असा एटीएसचा दावा आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांचा या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती, याचा तपास एटीएस घेत आहे. या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिरेनप्रकरणी एटीएसने आतापर्यंत 25 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून बरेच धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.