‘बिग बॉस’चा नवा सीझन लवकरच ! कोण असणार नवे स्पर्धक?

मुंबई : छोट्या पडद्यावरचा शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा 14वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या 15व्या सीझनची प्रतीक्षा आहे.

बिग बॉस 14च्या अंतिम सोहळ्यामध्ये सलमान खानने जाहीर केले होते की, 15 व्या हंगामात सामान्य लोकदेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकणार आहेत. म्हणजेच या पर्वात सेलिब्रेटींसह सामान्य लोक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

या शोची ऑडिशन प्रक्रिया फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती. बिग बॉस 15साठी ऑडिशनची प्रक्रिया 22 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि 31 मे 2021 पर्यंत चालणार आहे. शोमध्ये मेकर्सना धडाकेबाज स्पर्धक हवे आहेत, म्हणून ज्याला असे वाटते की आपण या शोसाठी परिपूर्ण आहोत, त्यांनी आपला व्हिडीओ शूट करुन तो ऑडिशनसाठी पाठवावा.

सध्या ‘बिग बॉस 15’च्या प्रीमियरची तारीख ऑक्टोबर 2021 असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.

या वेळी निर्मात्यांना काही एक्स जोड्यांसह, सामान्य लोकांना देखील शोमध्ये आणायचे आहे. याशिवाय दिव्यंका त्रिपाठी-विवेक दहियासह काही स्पर्धकांची नावे देखील पुढे आली आहेत. दिव्यांका सध्या खतरों के खिलाडी 11मध्ये भाग घेण्यासाठी केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी या दोघांकडे संपर्क साधला. मात्र, या जोडीने शोला होकार दिला आहे की, नाही याची अद्याप खात्री नाही.

‘बालिका वधू’मध्ये काम करणार्‍या नेहा मर्दाने नुकतीच पुष्टी केली की, बिग बॉस 15साठी तिच्याशी संपर्क झाला होता. नेहा म्हणते की, बायो बबलमध्ये शूटिंग केल्यामुळे तिला वाटते की, ती बिग बॉसच्या घरात मिनी ट्रायल देत आहे. ती म्हणाली, या अनुभवानंतर मी बिग बॉसमध्ये गेले तर मी एक प्रबळ दावेदार होईन आणि मी हा कार्यक्रम जिंकू शकेन. या शिवाय या शोमध्ये अभिनेत्री सान्या इराणी देखील दिसू शकते. या शोसाठी अभिनेत्रीला देखील ऑफर देण्यात आली आहे.

कशी कराल नोंदणी?
नोंदणी करण्यासाठी तुम्हाला व्हूट अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल किंवा तुम्ही www.voot.com वर जाऊनही नोंदणी करू शकता. नोंदणी फॉर्ममध्ये आपल्याला नाव, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता आणि ऑडिशन व्हिडीओ यासारखे काही तपशील विचारले जातील. या ऑडिशनसाठी आपण 18 वर्षाच्या वरीलचे असणे आवश्यक आहे. तसेच, व्हिडीओ 5 मिनिटांपेक्षा मोठा नसावा आणि 50 एमबीपेक्षा जास्त नसावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.